शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची गळा आवळून हत्या,  प्रियकर अटकेत    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 16:32 IST

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीकच्या परिसरातील झाडाझुडपांत तरूणीचा मृतदेह छोटया झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता.

कल्याण: भिवंडी कोनगाव परिसरात टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीक एका तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बुधवारी आढळुन आला होता. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. प्रियकर दिपक जगन्नाथ रूपवते याला अटक करण्यात आली आहे. तो कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहणारा आहे.बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीकच्या परिसरातील झाडाझुडपांत तरूणीचा मृतदेह छोटया झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दरम्यान भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डींगचे मागे एका महिलेला तिच्या प्रियकराने जीवे मारले आणि तो प्रियकर डोंबिवली पश्चिम भागात फिरत आहे अशी माहीती शनिवारी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. ही माहीती भोसले यांनी वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांना कळविली. त्यांनी कोनगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांना तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याची माहीती प्राप्त झाली. यावरून जॉन यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक नितीन मुदगुन आणि पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप, अजित राजपूत, मंगेश शिर्के, बाळा पाटील, सुरेश निकुळे, हरीश्चंद्र बंगारा, राहुल ईशी आदिंचे पथक डोंबिवली पश्चिमेत रवाना केले. पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन रेल्वे स्टेशन परिसर, गुप्ते रोड, भागशाळा मैदान असा परिसर पिंजून काढला.अखेर कोपर रेल्वे उड्डाणपूलाजवळ एक व्यक्ती गुप्त बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणो संशयास्पद स्थितीत फिरताना दिसली. त्या व्यक्तीला पोलिसांचा संशय येताच ती पळू लागली. मात्र पथकाने त्या व्यक्तीला पाठलाग करून पकडले व ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव दिपक रु पवते असल्याचे सांगण्यात आले.कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहणा-या रूपवते याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने वाडेघर परिसरात राहणा-या त्याच्या प्रेयसीची लग्नाला नकार देत असल्याकारणामुळे हत्या केल्याची कबुली दिली. तीला 9 ऑगस्टला संध्याकाळी चारच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास कल्याण येथील फडके मैदान येथून भिवंडी बायपास येथे रिक्षाने आणले आणि टाटा आमंत्रा बिल्डिंगचे जवळ झाडा- झुडपात नेऊन तीची ओढणीने गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह ओढणीसह झाडाला लटकवुन तिने आत्महत्या केली आहे असा देखावा बनवुन तेथून पलायन केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. आत्महत्या केल्याचा बनाव केलेल्या प्रकरणाचा शिताफीने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून आरोपी रूपवते याला पुढील कारवाई करीता कोनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनkalyanकल्याण