शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

By किरण शिंदे | Updated: June 19, 2025 17:54 IST

Crime news Pune: वेल्हा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पानशेत परिसरात ही घटना घडली आहे. स्थानिकाचा खून करून हे पाचही जण पसार झाले होते.

- किरण शिंदे

सध्या पुणे आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे राजभरातूनच नाही तर देशभरातून पुण्यात कामधंद्यानिमित्त, शिक्षणासाठी आलेली तरुणाई पानशेत, खडकवासला, लोणावळा अशा ठिकाणी फिरायला निघत आहे. परभणीच्या पुण्यात राहणाऱ्या पाच मित्रांनाही या आल्हाददायक वातावरणात पानशेतला जाण्याची आणि तिथे सिगारेट ओढण्याची तलफ आली होती. त्यांना तेथील स्थानिकाने हटकताच या तरुणांनी त्यालाच मारहाण करत ठार केल्याची घटना घडली आहे. 

 वेल्हा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पानशेत परिसरात ही घटना घडली आहे. स्थानिकाचा खून करून हे पाचही जण पसार झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्टेशनच्या पथकाने या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 

रोहिदास काळूराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता वेल्हे,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकाश सुभाष भिसे (वय २१), भागवत मुंजाजी आसुरी (वय २०) रितेश उत्तम जोगदंड (वय १९), रमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१) आणि पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १९)  यांना अटक केली आहे. मुळचे परभणीचे असलेले हे तरुण पुण्यातील नरे परिसरात राहतात. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, १५ जून रोजी हे सर्व तरुण पानशेत परिसरात पर्यटनासाठी गेले होते. पानशेत येथील नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर यातील काही तरुण सिगारेट ओढत होते. स्थानिक नागरिक असलेल्या रोहिदास काटकर यांनी या तरुणांना हटकले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली आणि एकाने तर त्याच्या छातीवर दगड मारला. यामध्ये रोहिदासचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला सुरुवात केली आणि यातील सर्व आरोपींना अटक केली. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे