शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पूजा कालीदेवीची, मात्र कार्यक्रमात तरुणींचा अश्लील नाच, गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: October 30, 2022 00:03 IST

Crime News: मीरारोडच्या शीतल नगर परिसरात एका आयोजकाने कालीदेवीची पूजा व भंडाराचा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यात ठेवला होता मात्र प्रत्यक्षात गाण्यांवर तरुणींचा अश्लील नाच - गाण्याचा कार्यक्रम चालविल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

- धीरज परब

मीरारोड - मीरारोडच्या शीतल नगर परिसरात एका आयोजकाने कालीदेवीची पूजा व भंडाराचा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यात ठेवला होता मात्र प्रत्यक्षात गाण्यांवर तरुणींचा अश्लील नाच - गाण्याचा कार्यक्रम चालविल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

२८ ऑक्टोबर रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या नुसार , मीरारोडच्या शीतल नगर मधील डिसीबी बँके जवळ सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर स्टेज बांधून  रात्री उशिरा पर्यंत नाच गाण्याचा कार्यक्रम चालत असल्याच्या तक्रारी जागरूक नागरिकांनी केल्या . त्या नंतर मीरारोड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हनीफ शेख व हवालदार बालाजी हरणे हे घटनास्थळी पोहचले असता काली देवीच्या पूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम असा फलक लावून स्टेज वर मात्र चित्रपटातील गाण्यांवर २ तरुणी अश्लील हावभाव करत नाचत असल्याचे दिसून आले . त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती .  पोलिसांनी  कार्यक्रमाचा आयोजक संजीवकुमार सदानंद सिंह ( ४६) रा . शितल फोरम, शितलनगर ह्याला  कार्यक्रम बंद करायला लावून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले .  

पोलिसां कडे ध्वनिमापक यंत्र नाही रात्री पावणे अकरा वाजले तरी सदर ध्वनिक्षेपक लावून नाच गाण्याचा धिंगाणा सुरु होता . घटना स्थळी पोलीस पोहचले व त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. परंतु पोलिसां कडे ध्वनिमापक यंत्र नसल्याने आवाजाची पातळी नोंद करता आली नाहीच शिवाय ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई सुद्धा पोलिसांना करता आली नाही असे उघड झाले आहे . ध्वनी प्रदूषण अधिनियम प्रमाणे कारवाई होणे आवश्यक असताना देखील कारवाई न झाल्याने जागरूक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर