शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

Crime News: पोलिसाला मारहाण, ४ जवान अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 03:06 IST

Crime News: पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भारतीय नौदल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना कफ परेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबई : पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भारतीय नौदल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना कफ परेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.        चारही आरोपी कफ परेडमध्ये फिरण्यासाठी आले होते. आरोपींनी रविवारी दुपारचे जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली. टॅक्सीने काही अंतर गेल्यानंतर एका आरोपीने टॅक्सीतच सिगारेट पेटवली. त्यास टॅक्सी चालकाने विरोध केला. मात्र, आरोपींनी टॅक्सी चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सिगारेटच्या मुद्यावरून टॅक्सी चालक आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या घटनेची माहिती मिळताच एक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाद मिटवण्यासाठी  प्रयत्न करू लागले. मात्र आरोपींनी उलट पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर नौदल अधिकारी अभिजित कुमार सिंग (३०) व आर. एस. दुबे आणि सीआयएसएफचे अधिकारी चंद्रभान सिंग (२६), प्रवीण अशोक सिंग (२७) यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक