शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पतीशी भांडण झाल्याने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; महिलेवर आठवडाभर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 18:36 IST

Crime News : महिलेला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि आठवडाभर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्याने  एका महिलेने घर सोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि आठवडाभर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बिहारच्या पाटणामध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं 10 ऑक्टोबर रोजी आपल्या पतीसोबत खूप मोठं भांडण झालं. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिला रागाच्या भरात घर सोडून गेली होती. तिने कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला आणि ट्रेन पकडण्यासाठी पटणा जंक्शन गाठलं. यानंतर ती महिला एका हॉटेलमध्ये गेली, जिथे तिने हॉटेल मालकाला कोलकाताला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारले. त्यावेळी त्याने महिलेला गोड बोलून आपल्या जाळ्यात फसवलं. तसेच तिच्या राहण्याची देखील एका ठिकाणी व्यवस्था केली. ट्रेन येईपर्यंत इथेच थांबा असं महिलेला सांगण्यात आलं. 

आठवडाभर महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार 

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही तासांनंतर आरोपींनी खोलीत जाऊन तिच्यावर बलात्कार केला. आठवडाभर महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. एक आरोपी तिच्यावर नजर ठेवण्यासाठी चोवीस तास खोलीच्या बाहेर उभा राहायचा. जेव्हा पीडित महिला कोलकाताला पोहचली नाही, तेव्हा तिच्या पतीने जक्कनपूर पोलिस स्टेशनमध्ये ती हरवल्याची तक्रार दाखल केली. तिच्याकडे असलेल्या मोबाईलच्या आधारे पाटणा जंक्शन हे तिचे शेवटचे स्थान असल्याचे आढळले. या अंतर्गत शोधमोहीम सुरू करण्यात आली.

वादातून तिने घर सोडून जाण्याचा मोठा निर्णय घेतला

महिलेचं लग्न झालं असून तिला दोन लहान मुलं आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत असायचा. अशातच झालेल्या वादातून तिने घर सोडून जाण्याचा मोठा निर्णय घेतला. यानंतर तिला नराधमांनी गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी अधिक तपास केला असता. महिलेला ज्या घरात डांबून ठेवले होते तिथे पोहचत त्यांनी महिलेची सुटका केली. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस