शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून 1.17 लाख केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 10:37 IST

Crime News : ड्रायव्हर करण यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखापेक्षा अधिक असलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

नवी दिल्ली - माजी आमदाराच्या एका ड्रायव्हरला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल 1.17 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. हरियाणाच्या पानिपत शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीच्या माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखापेक्षा अधिक असलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते छाजपूर येथील निवासी आहे. रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या गावाला जात होते. त्यावेळी धान्य गोदामाच्या जवळ येताच नंबर नसलेली एक बाईक आली. बाईकवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्या अंगावर मिरची पूड टाकली. यावेळी करण यांच्या डोळ्यातही मिरची पूड गेली. त्यावेळी चोरट्यांनी करण यांच्या जवळील 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

डोळ्यात मिरची पूड टाकली आणि ढकलून दिले

करण यांनी चोरट्यांना विरोध केला तसेच पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी पुन्हा करण यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांना ढकलून दिले. यावेळी करण खाली जमिनीवर पडले. या घटनेवेळी तेथे दुसरी बाईक आली आणि त्यावर तिघेजण बसले होते. एकूण पाच जणांनी मला पकडले आणि मारहाण केली. आरोपींनी मोबाईलही हिसकावला मात्र, तो तेथेच टाकून नंतर पळ काढला. करण यांनी सांगितले की, हे पैसे त्यांनी आपल्या एका मित्राकडून उधार घेतले होते.

गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू

सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी एसएचओ अतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाजपूर खुर्द येथे राहणारे करण आपल्या घरी जात होते. त्यावेळी दोन बाईकवर आलेल्या आरोपींनी त्यांना रोखले आणि त्याच्याकडील 1 लाख 17 हजारांची रोकड लुटली. आरोपींनी करण यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस