शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

खळबळजनक! एकतर्फी प्रेमात 'तो' झाला वेडा; लग्न ठरताच तरुणीच्या आईवर झाडली गोळी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:21 IST

Crime News : लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणीचं लग्न ठरलं म्हणून त्याने तिच्या आईवरच गोळी झाडली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तरुण मुलीसोबत बोलत होता. त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांनी तिचं दुसऱ्या एका तरुणाशी लग्न ठरवलं. लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या. 

तरुणीच्या आई आणि नातेवाईकांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आगश्या असं या तरुणाचं नाव असून त्याचं तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होतं. पण तिचं लग्न ठरल्याचं समजताच त्याने तरुणीच्या घरच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

 'तिचं' लग्न ठरलं म्हणून 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं

आरोपी संतोश आगश्या याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद नगर पोलीस ठाणे परिसरातील श्रीनगरमध्ये एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे त्याने तरुणीच्या घरी जाऊन गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधिकारी इंद्रमणी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश