शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पती झाला हैवान! लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यांत पत्नीचा काढला काटा; हुंड्यासाठी केलं भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:37 IST

Crime News : डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केल्यानंतर उपचारासाठी आणलेल्या सासरच्या लोकांनी मृतदेह टाकून पळ काढला. पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

नवी दिल्ली - हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हुंड्यात 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून नवविवाहितेची हत्या करण्यात आली आहे. महिलेचं अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केल्यानंतर उपचारासाठी आणलेल्या सासरच्या लोकांनी मृतदेह टाकून पळ काढला. पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. माहेरच्या मंडळींनी 8 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी वाल्मिकीनगर येथील गणौली येथील प्रियंकाचा विवाह चौतरवा येथील नादवाच्या अनिल गुप्ता याच्याशी झाला होता. लग्नापासूनच हुंड्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची मागणी केली जात होती. याच दरम्यान, प्रियंकावरही अत्याचार होत होते. सासरच्यांनी गळा आवळून हत्या केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

5 फेब्रुवारी रोजी झालं होतं लग्न 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारीला प्रियंका आणि अनिलने विधीवत सप्तपदी घेतले. हुंडा म्हणून त्याच्याकडून चारचाकी वाहनांची मागणी केली जात होती. बुधवारी रात्री अचानक त्यांना जावयाकडून माहिती मिळाली की, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली असून तिला उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. पण खरंतर मुलगी त्याचवेळी मृतावस्थेत होती.

प्रियंकाचे वडील भोला साह यांनी सांगितलं की, जावयाने आपल्या मुलीला फोन करून सांगितले होते. जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना प्रियंका कुमारीच्या मानेवर खुणा दिसल्या, त्यावरून तिचा गळा आवळून खून झाल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी जावयासह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी जावयाला अटक केली असून चौकशी सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी