शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

हत्येचा थरार! दारू पिण्यास हटकले म्हणून एकाची हत्या; दोन गंभीर, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:03 IST

Crime News : नऊ जणांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहे.

यवतमाळ - यवतमाळ येथील जयभीम चौक पाटीपुरा परिसरातील दवाखान्याजवळ सात जण दारू पित होते. यावरून त्यांना दोघांनी हटकले. त्यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी शनिवारी रात्री १०.४५ वाजता दोन्ही गट एकत्र आले. त्यावेळी नऊ जणांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहे. वैभव कृष्णराव नाईक (२३) रा. बांगरनगर असे मृताचे नाव आहे. तर नयन नरेश सौदागर (२२) रा. विठ्ठलवाडी व सुहास अनिल खैरकार (२६) रा. अशोकनगर पाटीपुरा हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हा हल्ला आरोपी शुभम वासनिक (२६), बंटी उर्फ रत्नदीप पटाले (२२), करण तिहले (२३), अर्जुन तिहले (२२), रोशन उर्फ डीजे नाईक (२५), प्रथम रोकडे (२१), अभी कसारे (२०) व इतर तीन जण सर्व रा. जयभीम चौक पाटीपुरा यांनी केला. ३० एप्रिल रोजी पाटीपुरा परिसरातील सरकारी दवाखाना येथे नयन सौदागर, वैभव नाईक, सुहास खैरकार यांचा आरोपींशी वाद झाला होता, आरोपी दवाखाना परिसरात दारू पित होते. त्यावरून त्यांना नयन व त्याच्या मित्राने हटकले. त्याचवेळी आरोपींनी नयनला शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मनोज कनोजिया याने मध्यस्थी करून सोडविला. त्यावेळी जाताना आरोपींनी तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी वैभव नाईक व त्याच्या मित्रांना जयभीम चौकात बोलविण्यात आले. तेथे दबा धरुन असलेल्या आरोपींनी एकाच वेळी तिघांवर धारदार चाकूने हल्ला केला. 

वैभव नाईक याच्या काखेत चाकूचा वार लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर तेथून नयन सौदागर व सुहास खैरकार यांनी पळ काढला. मात्र आरोपींनी पाठलाग करून त्यांच्यावरही चाकूने वार केले. आरडाओरडा होताच घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. नयनच्या पाठीवर तर सुहासच्या डोक्यात चाकूचा वार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ जखमींना घटनास्थळावरून उचलून शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे वैभवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर दोघांवर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर पाटीपुरा परिसरातील जुन्या हत्याकांडाची मालिका पुन्हा सुरू होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी आदेश अनिल खैरकार याने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी कलम ३०२, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

जखमी व मृतक आले होते पॅरोलवर

पाटीपुरा परिसरातील अनिल विजय थूल याच्या खुनात न्यायालयाने २०१७ मध्ये वैभव नाईक, सुहास अनिल खैरकार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यांच्यासह आठ जणांचा या हत्याकांडात समावेश आहे. हे सर्व नोव्हेंबर २०२१ पासून कोविड पॅरोल रजेवर आहेत. याच दरम्यान त्यांचा वाद झाला व शनिवारी रात्री हत्याकांड घडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ