शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मुलाने गळफास घेतलेला पाहून आईने घेतली विहिरीत उडी, सेक्सटॉर्शनने बळी घेतल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 08:15 IST

Crime News: सोशल मीडियावरून मैत्री करून ‘सेक्सटॉर्शन’चा  बळी ठरलेल्या कान्द्रेभुरे (सफाळे) येथील शैलेश दिनेश पाटील (२६) याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर दुःख अनावर झाल्याने त्याची आई कल्पना पाटील हिने जवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

- हितेन नाईकपालघर : सोशल मीडियावरून मैत्री करून ‘सेक्सटॉर्शन’चा  बळी ठरलेल्या कान्द्रेभुरे (सफाळे) येथील शैलेश दिनेश पाटील (२६) याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर दुःख अनावर झाल्याने त्याची आई कल्पना पाटील हिने जवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील कान्द्रेभुरे (ब्राह्मणपाडा) गावातील शैलेशने गुरुवारी घराशेजारील शेतात जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपला मुलगा घाईघाईत शेताच्या दिशेने गेल्याचे त्याच्या आईने पाहिले. 

बराच वेळ झाला, तरी तो घरी परत न आल्याने त्याच्या आईने शेताच्या दिशेने धाव घेतली. त्याची शोधाशोध केल्यावर शेतातील जांभळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेला त्याचा मृतदेह पाहून पाटील यांनी आक्रोश सुरू केला. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांना दुःख अनावर झाले आणि त्यांनी जवळच्या विहिरीत उडी घेतली. 

घटनेची माहिती गावात कळल्यानंतर सर्वांनी शेताकडे धाव घेतली. घटनेची वाच्यता होऊ नये, यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी दोघांच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार केले. महत्त्वाचे म्हणजे, गावात राहणाऱ्या पोलीस पाटील अनिषा पाटील यांनी याबाबत केळवे सागरी पोलीस ठाण्याला कुठलीही माहिती दिली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

पोलिसांनी घटनास्थळी भेट देत, नातेवाइकांशी चर्चा केली. मात्र, आमची कुणाविरोधात तक्रार नसून कुणावर संशय नसल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. 

अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट... - शैलेश पाटील याने फेसबुक अथवा व्हाॅट्सॲपवरून अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर शैलेशला ब्लॅकमेलिंग केले जात असावे व त्यातून शैलेशने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. - याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी म्हणाल्या, तरुणाचा मोबाइल ताब्यात घेत सायबर सेलच्या माध्यमातून तपास करू. लवकरच गुन्हा दाखल करू. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारFamilyपरिवार