शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मुलगाच झाला वैरी, संपत्तीसाठी मोठ्या लेकाने काढला वडिलांचा काटा; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 16:40 IST

Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. झारखंडमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. वडिलांचं धाकट्या मुलावर जास्त प्रेम होतं म्हणून संतापलेल्या थोरल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलगाच वैरी झाला असून संपत्तीसाठी मोठ्या लेकाने वडिलांचा काटा काढल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्यापेक्षा आपल्या धाकट्या भावावर वडील अधिक प्रेम करतात आणि संपत्तीतील हिस्साही त्यालाच देतात, याचा राग असलेल्या तरुणाने आपल्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी पोलिसांना जिल्ह्यातील हनवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्रामपूर गावामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर चुन्नी यादव असं मृत व्यक्तीचं नाव असल्य़ाचं समोर आलं. पोलिसांचत्या स्पेशल टीमने याबाबत अधिक तपास केला असता. मोठ्या मुलाने आपणच वडिलांची हत्या केल्याचं कबूल केलं. झारखंडमधील गोड्डा भागात राहणाऱ्या चुन्नी यादव यांना दोन मुलं आणि चार मुली होत्या. त्यापैकी थोरला मुलगा सुबोध यादव हा गेल्या काही वर्षांपासून वडिलांवर नाराज होता. 

चुन्नी यादव यांचा मृत्यू 

वडिलांनी अनेकदा त्यांच्या संपत्तीतील हिस्सा विकला होता आणि त्याचा मोठा वाटा ते लहान मुलाला देत असत. त्यामुळे वडील आपल्यासोबत दुजाभाव करत असल्याची खदखद सुबोधच्या मनात होती. घटनेच्या दिवशी देखील याच विषय़ावरीन सुबोध आणि त्याचे वडील चुन्नी यादव यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर धारदार शस्त्र घेऊन सुबोधने आपल्या वडिलांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये चुन्नी यादव यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी सुबोधला अटक केली आहे. आपणच खून केल्याची त्याने कबुली दिली. 

संतापलेल्या थोरल्याने उचललं टोकाचं पाऊल

धाकट्या भावाला अधिक संपत्ती देण्याच्या रागातून आपल्या हातून हे कृत्य घडल्याचं त्यानं म्हटलं आहे. वडिलांकडे असणाऱ्या जमिनीपैकी बरीचशी जमीन ही आईच्या श्राद्धासाठी त्यांनी विकली होती. त्यातील उरलेले पैसेही धाकट्या भावालाच दिले होते. आपल्याला आणि इतर बहिणींना ते काहीही देत नसत, अशी त्याची तक्रार होती. पोलिसांनी सुबोधविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी