शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: माडखोलची महिला, बांद्याचा तरुण, गोव्यात खून... 'गुगल पे'मुळे सापडला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:05 IST

Crime News: गोव्यातील हरमल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एका ३० वर्षीय महिलेवर  विषप्रयोग करून निर्दयपणे खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

सावंतवाडी /पणजी: गोव्यातील हरमल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एका ३० वर्षीय महिलेवर  विषप्रयोग करून निर्दयपणे खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. हा प्रकार ९ ते १३ मे दरम्यान घडला असल्याचा पोलीसांना संशय असून याप्रकरणी पोलिसांनी बांदा येथील गणेश विर्नोडकर (२५) याला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खुनाचा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील महिला ही आठवड्यापूर्वी हरमलक मधील त्या गेस्ट हाऊस वर उतरली होती.तिच्या सोबत बांदा येथील गणेश विर्नोडकर हा युवक होता तो तेथेच कामाला असतो.या महिलेने या गेस्ट हाऊस मध्ये ओळखपत्र ही दिले होते.मात्र सोमवारी 16  मे ला या गेस्ट हाऊस च्या  बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने रुमबॉयने व्यवस्थापकास सांगितले.

गेस्ट हाऊस च्या मालकाने रूमची पाहाणी केली असता रूम मधून च दुर्गंधी येत असल्याने व रूम ला कुलूप असल्याने पोलीसांना घटनास्थळी बोलवण्यात आले पोलीस दाखल होत रूमचा दरवाजा उघडून पाहाणी केली एका महिलेचा मृतदेह आढळून आला.मृतदेहा शेजारी काहि बाटल्या पडल्याने तिने विष घेतले असल्याचे भासवण्यात आले.पण पोलिसांकडून सर्व घटनेची माहिती घेतली तसेच तिच्या सोबत असलेला युवक कोण याबाबत कसून तपास करण्यात आला.

त्यावेळी हा मुलगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यानंतर त्यालाही गोवा पोलीसांनी बांदा येथून ताब्यात घेतले.ही महिला संशयित गणेशच्या मित्राची बायको असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तसेच हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय ही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

त्यांच्यात नेमके काय घडले ह्याचा शोध चालू आहे. पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी गतीने  तपास करीत संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी सायंकाळी उशिरा गोव्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अधिक तपास गोवा पेडणे पोलीस करीत आहे. ‘गुगल पे’ने शोध महिलेसोबतच्या युवकाने आपले ओळखपत्र दिले नव्हते. तो युवक १३ मे रोजी रात्री दरवाजाला कुलूप लावून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. संशयिताने ‘गुगल पे’च्या सहाय्याने गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला रुमचे भाडे दिले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने यंत्रणा गतिमान केली. आणि संशयित गणेशला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा