शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बापरे! 100 मजुरांना आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; आजार नसताना रुग्णालयात दाखल केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 09:25 IST

Crime News : तब्बल 100 मजुरांना मजुरी आणि जेवण देण्याचं आमिष दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

नवी दिल्ली - लखनऊच्या ठाकूरगंजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. शहरातील तब्बल 100 मजुरांना मजुरी आणि जेवण देण्याचं आमिष दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण आपल्यासोबत काहीतरी भलतंच घडतंय याची जाणीव झाल्यानंतर मजूर संतापले. रुग्णालयात त्यांनी प्रचंड गोंधळ सुरू केला. त्यानंतर मेडिकल टीम तिथे दाखल झाली. पोलिसांना या गोंधळाची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून रेस्क्यू करुन सर्व मजुरांना तिथून बाहेर काढण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी संबंधित मेडिकल कॉलेजविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मेडिकल कॉलेजच्या हेडलाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उघड झाल्यानंतर पीडित मजुरांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. एक व्यक्ती आमच्याकडे आला होता. त्याने आम्हाला जेवण आणि मजुरीचं आमिष दिलं होतं. त्याने आम्हाला रुग्णालयात बोलावलं. आम्ही त्या रुग्णालयात गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जेवण दिलं. त्यानंतर आम्हाला त्यांनी रुग्णालयातील बेडवर झोपायला सांगितलं. 

व्यक्तीने त्यानंतर आम्हाला डॉक्टर बघायला येतील, असं सांगितलं. त्यांनी आम्हाला फक्त बेडवर झोपायला सांगितलं होतं. पण थोड्यावेळाने आम्हाला इंजेक्शन दिलं गेलं. तसेच आमच्या हाताला सुई टोचली गेली, असं मजुरांनी सांगितलं. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, एमसी सक्सेना ग्रुप ऑफ कॉलेजमध्ये बनावट रुग्ण दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस अधिकारी सोमेन वर्मा यांनी या प्रकरणाविषयी माहिती दिली. संबंधित मेडिकल कॉलेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मजूर आणले गेले होते. 

मजुरांना 400 ते 500 रुपयांची मजुरी देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. यासोबतच जेवणही दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. संबंधित रुग्णालयात अवैध पद्धतीने उपचार सुरू होते. ज्या लोकांवर उपचार सुरू होता ते पूर्णपणे ठीक होते. याप्रकरणी रुग्णालयाचे डॉक्टकर शेखर सक्सेना याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. 'आजतक'ने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी