शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा कोयत्याने खून; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:24 IST

पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ भैया माणिक जाधव (रा.अरळीहट्टी)  व रामू नायकू इंगळे (रा.जकरहट्टी, ता. अथणी) या दोघा सशयितांना अटक केली असून अद्याप दोघे फरारी आहेत.

सांगली : प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील अरळीहट्टी (ता. अथणी, जि. बेळगाव) गावातील तरुणाचा सलगरे (ता. मिरज) गावच्या हद्दीत डोक्यावर, पोटावर, पाठीवर कोयत्याने सपासप वार करीत चौघांनी निर्घृण खून केला. संदीप रामराव आवळेकर (वय ३३) असे खून झालेल्याचे नाव आहे. दिनकर रामू जाधव (रा. अरळीहट्टी) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ भैया माणिक जाधव (रा.अरळीहट्टी)  व रामू नायकू इंगळे (रा.जकरहट्टी, ता. अथणी) या दोघा सशयितांना अटक केली असून अद्याप दोघे फरारी आहेत. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. 

याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संदीप आवळेकर आणि फिर्यादी दिनकर जाधव अरळीहट्टी गावाजवळच्या सलगरे येथे रुग्णालयात आले होते. उपचार करून दोघे दुचाकीवरून गावी अरळीहट्टीकडे रात्री नऊच्या सुमारास निघाले होते. दिनकर जाधव गाडी चालवत होते, तर आवळेकर मागे बसले होते. यावेळी पाठीमागून दोन दुचाकींवरून चौघे हल्लेखोर आले. त्यातील आकाश याने कोयत्याने आवळेकर यांच्या डोक्यात वर्मी घाव घातला. ‘आई गं, मेलो’ असे किंचाळत आवळेकर खाली पडले व गावच्या दिशेने पळू लागले. यावेळी आकाश जाधव, रामू इंगळे व अन्य दोघांनी पाठलाग केला. आवळेकर ठेच लागून पडल्यावर डोक्यात, पोटावर, पाठीवर सपासप वार करीत त्यांचा खून केला. हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले.गुरुवारी सकाळी घटनास्थळी जत विभागीय अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली. फरारी दोघांना शोधण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीKarnatakकर्नाटक