शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! चोरीच्या आरोपाखाली 'त्याला' पकडला पण 24 तासांत मृत्यू झाला; कुटुंबीयांचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 10:42 IST

Crime News : पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

नवी दिल्ली - कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे तरुणाने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या आरोपाखाली तरुणाला पकडण्यात आलं होतं पण त्यानंतर 24 तासांतच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या असंख्य जखमी आपल्या भावाच्या शरीरावर दिसत असल्याचा दावा मृत तरुणाच्या बहिणीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरातील कल्लू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी संशयित म्हणून चोरीच्य़ा आरोपाखाली पकडलं होतं. त्या रात्री तरुणाला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कुटुंबीयांना फोन आला आणि तरुणाला घेऊन जायला सांगण्यात आलं.

तरुणाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा 

तरुणाची तब्येत बरी नसून त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी कुटुंबीयांना दिला. पण कुटुंबीय कल्लूला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. कल्लूच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा जागोजागी दिसत होत्या. तो या वेदना सहन करत होता. अखेर वेदना सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनीच केलेली हत्या 

कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनीच केलेली हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कल्लूला पोलीस घेऊन गेले त्यावेळी त्याची तब्येत एकदम ठिक होती. असं असताना 24 तासांत असं काय घडलं की त्याचा मृत्यू व्हावा, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस