शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! पिताच झाला हैवान; दारूच्या नशेत मित्रांसह 9 वर्षीय लेकीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:01 IST

Crime News : पोलिसांनी सामूहिक बलात्कारातील तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

नवी दिल्ली - छत्तीसगडमधील जशपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पिताच हैवाऩ झाला असून दारूच्या नशेत मित्रांसह 9 वर्षीय लेकीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. नऊ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडितेने तिच्या आजीला माहिती दिली. त्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलिसांत तक्रार करण्यात आली. 

पोलिसांनी सामूहिक बलात्कारातील तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात हा आरोपी आपल्या तीन मुलांसह आणि वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. आरोपीच्या पत्नीचा 2019 मध्ये मृत्यू झालेला आहे. 28 एप्रिलला रात्री दारूच्या नशेत आरोपी त्याच्या दोन मित्रांसह आपल्या घरी आला. यावेळी त्याची तिन्ही मुलं (एक 3 वर्षांचा, तर दुसरा 6 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी) झोपले होते. 

आरोपीने आपल्या 9 वर्षाच्या मुलीला झोपेतून उठवले आणि तिला दुसऱ्या रुममध्ये घेऊन गेला. यानंतर त्याने मित्रांसोबत आपल्याच मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने आपल्या लहान भावांना तसेच आजीला याबाबत सांगितले. पीडित मुलगी जवळच्या गावात असलेल्या आपल्या आजीकडे तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आजीने नारायणपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पिता आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात 376 (घ) 376 (क,ख) पॉस्को कायदा 4,6,17 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी