मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या मृत्यूमुळे नानाविध चर्चांना उधाण आले. यातच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, पोलीस महासंचालकांकडून याबाबत अधिक माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे.प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी दुपारी चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांकडून हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे म्हटले जात आहे. तर, राजकीय मंडळीकडून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार साईलची तपासणी करणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी सर्वांचे जबाब नोंदवून याचा योग्य तो चौकशी अहवाल गृहविभागाला देण्यात येणार आहे.
Crime News: प्रभाकर साईलच्या मृत्युप्रकरणी चौकशी, नातेवाईक, डॉक्टरांचे नोंद होणार जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:59 IST