शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: खेळता खेळता गायब झाला, पाण्याच्या टाकीत चिमुकल्याचा मृतदेह सापडला, कुटुंंबीयांच्या भूमिकेमुळे संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:03 IST

Crime News: एका दीड वर्षांच्या बालकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पाण्याच्या टाकीवर झाकण लावलेले होते. त्यातच मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता परस्पर मृतदेह दफन केल्याने संशय बळावला आहे.

जयपूर - राजस्थानमधील कोटा शहरातील कर्बला परिसरात एका दीड वर्षांच्या बालकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पाण्याच्या टाकीवर झाकण लावलेले होते. हा मुलगा तिथे कसा काय पोहोचला, याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यातच मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता परस्पर मृतदेह दफन केल्याने संशय बळावला आहे. मृत मुलाच्या आजोबांनी मुलाची हत्या झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात मृत मुलाचे कुटुंबीय संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगा खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. खूप शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. अखेर सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह घराच्या दुसऱ्या मजल्यावरील टाकीमध्ये सापडला. धक्कादायक बाब म्हणजे टाकीवर झाकण लावलेले होते. त्यामुळे संशय बळावला आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना न सांगता कुटुंबीयांनी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली.

प्राथमिक तपासामध्ये मृत अबीरचे वडील इम्रान हे नगरपालिकेमध्ये कामाला असल्याचे समोर आले. त्यांनी सांगितले की, त्यांचे ९ भावांचे कुटुंब आहे. दोघेजण एका घरात राहतात. तर बाकीचे ७ जण समोरच्या घरात राहतात. माझा मुलगा सोमवारी बेपत्ता झाला होता. खूप शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह टाकीमध्ये सापडला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, मृत मुलाचे आजोबा सईद यांनी त्याची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान