शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! "डियल प्लीझ मला जरा पुढे सोडशील?"; महिलेने मागितली लिफ्ट अन् पुढे झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 13:01 IST

Crime News : एका महिलेने लिफ्ट मागून पुढे जे काही केलं ते अतिशय भयंकर होतं. या महिलेचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

एखाद्या ठिकाणचा प्रवास करत असताना काही वेळा अनेकजण लिफ्ट मागतात. माणुसकीच्या नात्याने त्या लोकांना मदतही केली जाते. पण कधीकधी अशा लोकांना लिफ्ट देणं धोकादायक ठरू शकतं, चांगलंच महागात पडू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका महिलेने लिफ्ट मागून पुढे जे काही केलं ते अतिशय भयंकर होतं. या महिलेचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

रात्रीच्या वेळेस वर्दळ नसलेल्या रस्त्यावर उभं राहून महिलेने लिफ्ट मागितली. रस्त्याने जाणाऱ्याने लिफ्ट दिल्यावर चाकूचा धाक दाखवून महिलेने त्या व्यक्तीची लूटमार केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गांधीनगर भागातील सुपर कॉरिडॉरवर रात्र होताच एक महिला एकटी उभी राहते. तिथून एखादी व्यक्ती जाताना पाहून ती त्याला लिफ्टसाठी थांबवते. रात्रीच्या वेळी उभी असलेली महिला पाहून लोक तिला लिफ्ट देतात.

महिलेला ज्याच्याकडून लिफ्ट घ्यायची असते त्याला ती डिअर असं म्हणून थांबवते. तिच्या बोलण्यावरून ड्रायव्हर तिला हाय प्रोफाईल स्त्री समजतो आणि तिच्या बोलण्यात येऊन सहज लिफ्ट देतो. गाडी निर्जन भागात पोहोचताच महिला या व्यक्तीला थांबवून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देते आणि लूट करते. एखाद्याने विरोध केला तर चाकू दाखवून महिला त्याला लुटते. अशाच एका लुटमारीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पोलिसांनी ही बाब निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे काही व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या आधारे पोलीस वेगवेगळ्या भागात रात्रीची गस्त घालतील आणि आरोपींचा शोध घेतील. एसीपी रुबिना मिर्झा यांनी सांगितलं की, तक्रारदाराने तक्रार केली आहे. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. लवकरच आरोपीला पकडलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश