शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: देवीला प्रसन्न करण्यासाठी पित्याने दिला पोटच्या पोरीचा बळी, जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:26 IST

Crime News: बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये अत्यंत भयंकर घटना घडली आहे.  एका सणकी पित्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाटणा - बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये अत्यंत भयंकर घटना घडली आहे.  एका सणकी पित्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह जाळला. अंधश्रद्धेतून घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येच्या या घटनेची वार्ता जंगलातील आगीप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरली आहे. तसेच लोकांकडून उलटसुलट चर्चा होत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार घरात सापडलेल्या रक्ताच्या डागांमुळे या व्यक्तीने केलेल्या कुकृत्यांचा पर्दाफाश खाला आहे. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याल आले. हा धक्कादायक प्रकार सीतामधीमधील कुशमारी पंचायतीच्या हद्दीतील उफरौलिया गावात घडला आहे. .येथे एका व्यक्तीने आपल्या १२ वर्षीय मुलीची हत्या केली. घरामध्ये रक्ताचे डाग सापडल्याने तसेच मुलगी बेपत्ता असल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी त्याला पकडले. तसेच त्याला बांधून पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

एका मुलीचा मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. स्थानिकांनी सांगितले की, आरोपी इंदल महतो हा मांत्रित-तांत्रिकांच्या नादी लागलेला होता. त्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी पोटच्या पोरीचा बळी दिला असावा, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.  आरोपीला तीन मुली होत्या. त्यातील मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. तर धाकटी मुलगी आईसोबत माहेरी राहते. तर मधली मुलगी पित्यासोबत एकटी राहायची. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारFamilyपरिवार