शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: तीन महिलांसोबत करत होता पार्टी, अचानक दोघांचा झाला मृत्यू, दोन महिलाही गंभीर, नेमकं घडलं काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 08:31 IST

Crime News: हरियाणामधील गुरुग्राम येथील नाईट क्लबमध्ये पार्टी करत असलेला क्लबचा मालक आणि त्याच्या एका मैत्रिणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला आहे. त्यांच्यासोबत पार्टी करत असलेल्या अन्य दोन महिलाही गंभीर अवस्थेत सापडल्या आहेत.

गुरुग्राम - हरियाणामधील गुरुग्राम येथील नाईट क्लबमध्ये पार्टी करत असलेला क्लबचा मालक आणि त्याच्या एका मैत्रिणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला आहे. सोमवारी संध्याकाळी दोघांचे मृतदेह क्लबच्या खोलीमध्ये सापडले. दरम्यान, त्यांच्यासोबत पार्टी करत असलेल्या अन्य दोन महिलाही गंभीर अवस्थेत सापडल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या क्लबच्या मालकाचे नाव संजीव जोशी आहे. या प्रकरणी एसीपी डीएलएफ विकास कौशिकने सांगितले की, मृत संजीव हा त्याच्या तीन मैत्रिणींसह रविवारी रात्री नाईट क्लबमध्ये आला होता. तिथे एका मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी केली जात होती. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी संजीव आणि त्याच्या एका मैत्रिणीचा मृतदेह सापडला. ज्या मैत्रिणीचा वाढदिवास होता तिचाच हा मृतदेह होता. तर याच खोलीत दोन इतर महिलाही गंभीर अवस्थेत सापडल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

एसीपी विकास कौशिक यांनी सांगितले की, ज्या खोलीमध्ये सर्वजण पार्टी करत होते तिथे अंगीठी (विस्तव) जळत होता. रात्री उशिरा सर्वजण येथे पार्टी करण्यासाठी आले होते. त्यानंतर काल संध्याकाळी दोघांचे मृतदेह सापडले. तर दोघीजणी गंभीर अवस्थेत सापडल्या. विस्तवाच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

आता मृतदेहांचं शवविच्छेदन केले जात आहे. त्यानंतरच मृत्यबचं खरं कारण समोर येईल. सध्यातरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नाईट क्लबमधील लोकांची चौकशी केली जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाDeathमृत्यू