शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पतीने सत्तुराने सपासप वार करून केला पत्नीचा अमानुषपणे खून, पोलिसांनी आवळल्या आरोपी पतीच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 00:05 IST

Crime News: व्यसनाधीन व कर्जबाजारी पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या असहाय्य पत्नीची दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने सत्तुराने  सपासप वार करून अमानुषपणे खुन केला. ही घटना हुपरी येथे आज  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

कोल्हापूर - व्यसनाधीन व कर्जबाजारी पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या असहाय्य पत्नीची दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने सत्तुराने  सपासप वार करून अमानुषपणे खुन केला. ही घटना हुपरी येथे आज  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.समिना इम्तियाज नदाफ(वय २७ सध्या रा. रेंदाळ)असे त्या  पत्नीचे नाव आहे. इम्तियाज राजू नदाफ (वय ३२ रा.मुळगाव कोरोची सध्या रा. रेंदाळ)असे त्या निर्दयी पतीचे नांव आहे.पत्नीची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या इम्तियाजला सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पाठलग करून हत्यारासह पकडले.

दरम्यान या हल्ल्यात समिनाचे वडील ही जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी सी पी आर मध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, इम्तियाज व्यसनाधीन व कर्जबाजारी झाल्याने त्याच्यात व समिना मध्ये वारंवार वादविवाद व भांडणे होत असल्याने नाईलाजाने गेल्या कांही महिन्यांपासून इम्तियाजसोबत माहेरी रेंदाळ येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होती. पंधरा दिवसांपूर्वी इम्तियाजने नेहमीप्रमाणे भांडण करून प्रापंचिक साहित्यनिशी कोरोची येथे राहण्यासाठी गेला होता. मात्र त्याच्यासोबत समिना व दोन मुले गेली नव्हती. त्यामुळे तो मुलांनाही आपल्या कोरोची गावी बोलवत होता. त्यासाठी तो काल दिवसभर समिना व त्याच्या मुलांना सातत्याने फोन करीत होता मात्र त्याचा फोन कुणीही घेतला नाही.

हाच राग मनात धरून इम्तियाज आज रात्री 9च्या सुमारास हुपरीतील समिनाच्या वडिलांच्या  गाड्यावर आला. यावेळी समिना वडिलांसोबत काम करत होती. आधीच दारूच्या नशेत असणाऱ्या इम्तियाजने यावेळी गाड्यावरील सत्तूर घेवून समिनाला मारण्याच्या हेतूने समिनाच्या अंगावर धावून गेला. त्यांने सतुराने केलेला वार चुकवून समिनाने तेथून धावत जात जवळच्याच इस्त्रीच्या दुकानात आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. तेथे जावून इम्तियाजने समीना हिच्या खांद्यावर अत्यंत निर्दयी पणे सपासप वार करून तिचा खून केला. या वेळच्या हल्ल्यात समिना हिचे वडील ही जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या इम्तियाजचा पाठलाग करून सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी त्याला रक्ताने माखलेल्या सत्तुरासह पकडले.या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरFamilyपरिवार