शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मधुचंद्राची रात्र ठरली नवऱ्याची अखेरची रात्र, सकाळ होताच उचललं टोकाचं पाऊल, घेतला गळफास, आत्महत्येच्या कारणाबाबत संभ्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 22:16 IST

Crime News: मधुचंद्राची रात्र संपताच नववधूच्या डोक्यावरील कुंकू पुसला गेला. सकाळीच नवऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनंतर कुटुंबाच शोकाचे वातावरण आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील हावडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मधुचंद्राची रात्र संपताच नववधूच्या डोक्यावरील कुंकू पुसला गेला. सकाळीच नवऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना बी. गार्डन ठाण्यांतर्गत शालीमार परिसरातील आहे. या घटनेनंतर कुटुंबाच शोकाचे वातावरण आहे. तर कुटुंबीय आणि पोलीस आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये ही घटना आत्महत्येची दिसत आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूच्या खऱ्या कारणांचा शोध लागणार आहे. मात्र सध्यातरी वराच्या मृत्यूच्या कारणाबाबतचं गुढ अद्याप कायम आहे.  नववधूलाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. मधुचंद्राच्या रात्री असे काय घडले ज्यामुळे तिच्या पतीने जीवन संपवले, असा प्रश्न तिला पडला आहे. दरम्यान, पोलीस याबाबत कुटुंबीयांचा जबाब घेत आहेत.

शालीमारनगरमधील आदर्श साव याचा विवाह बॅरकपूरमधील तरुणीशी झाला होता. बुधवारी वरात घरी पोहोचली. गुरुवारी मधुचंद्र आणि शुक्रवारी भोजनाचा कार्यक्रम होता. मात्र शुक्रवारी सकाळी नववधू आंघोळ करून खोलीत आली तेव्हा तिने पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि एकच खळबळ उडाली.

त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नववधूने सांगितले की, लग्न ठरल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघेही संपर्कामध्ये होते. तसेच रोज फोनवरून बोलायचे. आम्हा दोघांनाही लग्नाचे वेध लागले होते. तसेच रोज फोनवरून बोलणेही होत होते. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी असे काय घडले ते मला समजत नाही आहे. माझं जग वसण्याआधीच उद्ध्वस्त झालंय.

दरम्यान, या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू आहे. तसेच लवकरच त्याचा उलगडा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून आजूबाजूच्या तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली जात आहे. पोस्टमार्टमनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवला जाईल. पोलीस अनेक पैलूंकडे लक्ष ठेवून तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न