शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: एटीएममध्ये सापडला छुपा कॅमेरा, कार्ड स्किमर, आरबीएल बँकेच्या ग्राहकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 10:14 IST

Crime News: एटीएम पिन चाेरून किंवा त्याचे क्लाेनिंग करून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मीरा राेडमध्ये एका एटीएममध्ये पिन टाकताना ताे जाणून घेण्यासाठी गाेपनीय कॅमेरा आणि कार्ड स्किमर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मीरा रोड : एटीएम पिन चाेरून किंवा त्याचे क्लाेनिंग करून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मीरा राेडमध्ये एका एटीएममध्ये पिन टाकताना ताे जाणून घेण्यासाठी गाेपनीय कॅमेरा आणि कार्ड स्किमर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मीरा राेड पाेलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कनकिया परिसरात  इरासियामध्ये आरबीएल बँकेच्या शाखेलगतच एटीएम सेंटर आहे. या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत मारुती पाटील हे रखवालदार नेमले आहेत. या वेळेनंतर तेथे कुणीच नसते. पाटील यांनी एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतात, तेथून पडलेली वस्तू त्यांनी बँकेचे सहायक व्यवस्थापक राेहित कावर यांना दाखवली. तेव्हा ग्राहकांचे डेबिट कार्ड काॅपी करण्यासाठी स्किमर बसविल्याचे लक्षात आले. तर की-पॅडच्या वरच्या बाजूला पत्र्याच्या प्लेटवर गोपनीय कॅमेरा  चिकटवल्याचेही आढळून आले. त्याला बॅटरी आणि १६ जीबीचे मेमरी कार्ड जोडलेले होते. या कॅमेऱ्याद्वारे ग्राहकांचा पिन नंबर टिपला जात हाेता. चाैकशीत या एटीएममधून काही ग्राहकांचे बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर ५ एप्रिलला कवर यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर एटीएममध्ये २४ तास सुरक्षारक्षक ठेवण्याची व सीसीटीव्ही यंत्रणा आणि फुटेज देखरेखीखाली ठेवण्याची मागणी हाेत आहे.

सीसीटीव्ही  फुटेजद्वारे तपास- एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. - त्यात कॅमेरा व स्किमर लावणाऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत. - नेमक्या किती ग्राहकांची   आणि किती रक्कम भामट्याने खात्यातून काढली, याचा तपशील समजू शकलेला नाही. - घटनेप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारी