बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल गुरुवारी रात्री भोजपूर जिल्ह्यातील अयार पोलीस स्टेशन परिसरातील भेदरी गावात एक कुटुंबातील दोन भावांवर जमिनिच्या वादातून गोळीबार केला. शेत नांगरण्याच्या वादातून सशस्त्र आरोपींनी दोन भावांवर गोळ्या झाडल्या.
यामध्ये मोठ्या भावाचा मृत्यू झाला. तर, दुसरा मध्यम भाऊ जखमी झाला. मृत ४२ वर्षीय भगवान सिंह हा भेदरी गावातील रहिवासी हरी किशोर सिंग यांचा मुलगा होता. मृताच्या डाव्या छातीवर आणि हातावर गोळ्या लागल्याचे आढळून आले आहे.
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
गोळी लागून जखमी झालेला दुसरा भाऊ ४० वर्षीय दादन सिंह याच्यावर आरा येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या भावाचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना कमरेला गोळी लागली आहे. दोन्ही भाऊ व्यवसायाने शेतकरी आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून चार काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान, रात्री उशिरा एसपी राज यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. ही घटना जमिनीच्या वादातून घडली आहे. त्यांच्याच सह-भाडेकरूंसोबत वाद सुरू आहे.
यापूर्वी वादामुळे जमिनीवर प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.
वाटेतच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, भेदरी गावातील रहिवासी हरि नारायण सिंह आणि लल्लू यादव यांच्यात बऱ्याच काळापासून जमिनीचा वाद सुरू होता. दरम्यान, गुरुवारी रात्री दोन्ही भाऊ शेत नांगरत असताना वाद वाढला. दुसऱ्या बाजूच्या लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान, सशस्त्र गुन्हेगारांनी मोठ्या आणि मधल्या भावांवर गोळीबार केला. यामध्ये मोठा भाऊ मृत्युमुखी पडला. तर, मधला भाऊ जखमी झाला.
दोन्ही भाऊ शेतात नांगरणी करण्यासाठी गेले होते, त्यांनी विरोध केला तेव्हा गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
मृताचे वडील हरी किशोर सिंह म्हणाले की, ते तीन भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे २२ बिघा जमीन आहे. वाटणीनंतर त्यांना सात बिघा जमीन मिळाली. त्यापैकी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांनी २२ कठ्ठा जमीन त्याच गावातील एका व्यक्तीला विकली.
पण, २० दिवसांपूर्वी लल्लू सिंहने त्यांची उर्वरित जमीन आणि त्यांच्या दोन भावांची जमीन जबरदस्तीने कमी किमतीत विकत घेतली होती. गुरुवारी, त्यांचे दोन्ही मुलगे त्यांच्या शेतात नांगरणी करण्यासाठी गेले असताना, लल्लू सिंह तिथे आला आणि शेत नांगरण्यास नकार देऊ लागला.
या वादावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर लल्लू सिंहने दोन्ही भावांवर गोळीबार केला. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना गधानीहून सदर हॉस्पिटल आरा येथे उपचारासाठी आणण्यात आले.