शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : गोंदिया हत्याकांडात मारेकरी बाहेरचा की घरचाच? गुढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 23:09 IST

Crime News: गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या चुरडीतील (ता. तिरोडा) हत्यांकाडातील मारेकरी बाहेरचा की घरचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरेवचंद यांच्या शरीरावर जखम नाही. कपड्यांवर मात्र रक्ताचे शिंतोडेप्राथमिक वैद्यकीय अहवालात रेवचंदचा गळफासामुळेच मृत्यूश्वान घरातच घुटमळले, मृतदेहाकडे बघून भुंकलेझटापटीच्या खुणा नाहीत. लुटमारीचेही निशाण नसल्याची पोलिसांची माहिती

- नरेश डोंगरे नागपूर - गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या चुरडीतील (ता. तिरोडा) हत्यांकाडातील मारेकरी बाहेरचा की घरचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित केला आहे.एकाच कुटुंबातील रेवचंद तसेच मालता बिसेन हे दाम्पत्य आणि त्यांची पौर्णिमा आणि तेजस ही दोन मुले अशा चाैघांचे मृतदेह आढळून आल्यापासून गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवजड वस्तूने प्रहार करून मालता, पौर्णिमा आणि तेजसची हत्या करण्यात आली. तर, रेवचंद यांच्या शरीरावर एकही जखम नाही. त्यांच्या कपड्यांवर मात्र रक्ताचे शिंतोडे आहे. या हत्याकांडाचे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला तेथे नेले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीचा छडा लावण्यासाठी आणलेले श्वान घरातच घुटमळले आणि नंतर ते रेवचंदच्या मृतदेहाकडे बघून भुंकू लागले.

डॉक्टरांनी चाैघांचा पोस्टमार्टम अहवाल देताना तिघांची गंभीर दुखापतीमुळे आणि रेवचंदची गळफास लावल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे. रेवचंदच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. त्यामुळे आधी तिघांची हत्या करून नंतर रेवचंदने आत्महत्या केली की काय, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. घरात झटापटीच्या कोणत्याही खुणा नाहीत. लुटमारीचेही कोणते निशाण नाही. त्यामुळे या हत्या करणारा आरोपी बाहेरचा की घरचाच, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या संबंधाने आम्ही सर्वकश चाैकशी करीत आहोत. त्यामुळे या घडीला काही निष्कर्ष काढता येणार नाही, असे गोंदियातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत.

 गोंदिया पोलीस अधीक्षक म्हणतात....

घटनास्थळावरची एकूणच स्थिती, वैद्यकीय अहवाल आणि श्वानाने दिलेले संकेत लक्षात घेता मारेकरी बाहेरचा वाटत नाही. तरीसुद्धा आम्ही सर्व अँगल तपासत आहोत. ठोस निष्कर्षानंतरच आरोपीचे नाव जाहिर करू. - विश्व पानसरे, (पोलीस अधीक्षक, गोंदिया)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी