शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : प्रेमासाठी महिला सरपंचाने हद्द ओलांडली; पती आणि तीन मुलांनां सोडून फरार झाली, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 14:56 IST

Crime News: एक विवाहित महिला सरपंच त्याच गावातील एका प्रियकराच्या प्रेमात पडली. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. अखेर त्यांच्यातील संबंध इतके पुढे गेले की या महिलेने त्या प्रियकरासाठी कुटुंब, पती आणि मुलांनाही सोडले.

पाटणा - बिहारमध्ये प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक विवाहित महिला सरपंच त्याच गावातील एका प्रियकराच्या प्रेमात पडली. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. अखेर त्यांच्यातील संबंध इतके पुढे गेले की या महिलेने त्या प्रियकरासाठी कुटुंब, पती आणि मुलांनाही सोडले. ती घरातून पसार झाली तेव्हा कुटुंबीयांना सुरुवातीला काहीतरी घातपात झाल्याची शंका आली. मात्र जेव्हा प्रेमप्रकरणातून सदर महिला पसार झाल्याचे समजले तेव्हा तिच्या पायाखालील वाळू सरकली.

महिला सरपंचाच्या प्रेमप्रकरणाची ही घटना सीतामढी जिल्ह्यातील कन्हौली ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खाप खोपराहा पंचायतीमध्ये घडली. तिथे एक ३८ वर्षीय महिला सरपंच ९ मार्च रोजी फरार झाली. खूप शोधाशोध केल्यावर पतीने तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. तसेच गावातील तीन जणांविरोधात संशय व्यक्त केला.

महिला सरपंचाच्या पतीने सांगितले की, ९ मार्च रोजी सकाळी फिरण्यास गेले असताना ही महिला बेपत्ता झाली. त्यानंतर त्याने तिचा खूप शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. तसेच तिचा मोबाईलही स्वीच ऑफ आला. थकून भागून १५ मार्च रोजी त्याने १५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात पत्नीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. त्यात तीन जणांवर संशय व्यक्त केला. तसेच या तिघांनी लग्नाचा हेतू  आणि माझ्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी माझ्या पत्नीला फूस लावून पळवले, असा आरोप केला.

दरम्यान, गावापासून शहरापर्यंत सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुले लग्नाची झाली असताना सदर महिला प्रियकरासोबत फरारी झाल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या महिला सरपंचालाला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. एक मुलगा बीएससीचं शिक्षण घेत आहे. तर मुलगी दहावीत आहे, तर दुसरा मुलगा हा नववीत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारFamilyपरिवारPoliticsराजकारण