शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: दोन मुलांच्या पित्याला पत्नीने गर्लंफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, त्यानंतर नको ते घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:48 IST

Crime News: छत्तीसगडमधील कोरबा येथे एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या खोलीमध्येच फाशीच्या फंद्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह जप्त करून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रायपूर - छत्तीसगडमधील कोरबा येथे एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या खोलीमध्येच फाशीच्या फंद्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह जप्त करून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये समजले की, विवाहित व्यक्तीचे कुठल्या तरी अन्य महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. एकेदिवशी पत्नीने या दोघांनाही रंगेहात पकडले. प्रेमप्रकरणाचं गुपित उघड झालं तेव्हा पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागला. तसेच झाल्या प्रकारामुळे सदर व्यक्ती खूप खजील झाली होती. त्यानंतर या तरुणाने गेल्या सोमवारी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. कोरबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानिणपूर चौकी क्षेत्रातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे कुठल्यातरी महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, असे सांगण्यात येत आहे. या प्रेमप्रकरणाची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली. त्यानंतर त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. माणिकपूर चौकी क्षेत्रातील कुआंभट्टा परिसरामध्ये राहणारा सद्दाम हुसेन हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. त्याने त्यापूर्वीही एक लग्न केलं होतं. मात्र काही कारणामुळे त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सोडले होते. आता तो त्याच्या दुसऱ्या पत्नीसह राहत होता. दुसऱ्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोमवारी कुटुंबामधील सर्वजण भोजन करून झोपले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा सद्दामची पत्नी झोपून उठली तेव्हा तिला दुसऱ्या खोलीमध्ये पतीचा मृतदेह दिसला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. तेव्हा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. चौकशीमध्ये पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. त्याआधारे पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार