शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

क्रूरतेचा कळस! मुलींची हत्या करणारा सीरियल किलर; 2 वर्षांत चौघींचा घेतला जीव, 'असा' रचत होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:48 IST

Crime News : 22 वर्षीय मुलीची हत्या झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याआधी आरोपीने तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलींची हत्या करणाऱ्या सीरियल किलरने दोन वर्षांत चार जणींचा जीव घेतला आहे. फरीदाबादमध्ये 22 वर्षीय मुलीची हत्या झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याआधी आरोपीने तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलींची छेड काढायचा. मुलींनी त्याला विरोध केला असता रागाच्या भरात तो त्यांचा जीव घ्यायचा. 

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. यातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची देखील शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सीरियल किलर असून तो 1986 पासून हत्या करत आहे. सिंहराज असं या 54 वर्षीय आरोपीचं नाव असून तो सध्या सिटी हॉस्पिटल येथे गार्डची नोकरी करत होता. आरोपीने 31 डिसेंबर रोजी आपल्या एका ओळखीच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. 

आरोपीने याआधी केलेल्या भयंकर गुन्ह्यांची दिली कबुली 

मुलीने आरोपीला विरोध केला असता त्याने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर आरोपी तिचा फोन घेऊन फरार झाला होता. पोलीस तेव्हापासून त्याचा शोध घेत होते. काही पुरावे हाती लागल्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने याआधी केलेल्या भयंकर गुन्ह्यांची कबुली दिली. हे ऐकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

काका आणि त्याच्या मुलाची केली होती हत्या 

पोलिसांनी सांगितलं की, 31 डिसेंबर रोजी मुलीची हत्या करण्याआधी देखील आरोपीने काही लोकांची हत्या केली आहे. सिंहराजने 1986 मध्ये आपला काका आणि त्याच्या मुलाची हत्या केली होती. त्यानंतर त्याला अटक देखील झाली होती. 2019 मध्ये चहाची टपरी चालवणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीची देखील छेड काढली होती. तिने विरोध केला असता तिची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला  होता. ऑगस्ट 2020 मध्ये देखील एका मुलीची हत्या केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस