शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Crime News: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झाली फसवणुकीची शिकार, घातला सव्वा चार कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 09:48 IST

Bollywood actress Rimi Sen : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अभिनेत्रीला कथित इन्वेस्टमेंटच्या नावाखाली सुमारे सव्वा चार कोटींचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अभिनेत्रीला कथित इन्वेस्टमेंटच्या नावाखाली सुमारे सव्वा चार कोटींचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या फसवणुकीनंतर अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच खार पोलिसांनीही आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरू केला आहे.

या अभिनेत्रीसोबत कथितपणे फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. खार पोलिसांनी हल्लीच सांगितले की, बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिने गोरेगावमधील एक व्यावसायिक रौनक जतीन व्यास यांच्याविरोधात गुंतवणुकीच्या नावाखाली कथितपणे ४.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यानंतर आयपीसी कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

रिमी सेन हिने हंगामा, धूम, बागबान, गोलमालसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. मात्र तिला खरी ओळख विनोदी चित्रपटांमधून मिळाली होती. ती तिचं सौंदर्य आणि फिट बॉडीसाठीही प्रसिद्ध होती. मात्र सातत्याने हिट चित्रपट केल्यानंतरही रिमी सेन हिने बॉलिवूडला रामराम ठोकला. चित्रपटसृष्टीपासून दूर जाऊन तिला दहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

तिने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटांमध्ये ग्लॅमरस प्रॉपची भूमिका करू मी थकले होते. हे खूपच कंटाळवाणे होते. दरम्यान, तिला एकवेळ केवळ विनोदी चित्रपटच ऑफर केले जात होते. तिने फिर हेराफेरी, हंगामा आणि गोलमालसारख्या चित्रपटात काम केले होते. एकसारख्या भूमिका करून ती थकली होती. तिच्यामते त्यावेळी संपूर्ण इंडस्ट्री मेल डॉमिनेटिंग होती. अभिनेत्री केवळ सहाय्यक भूमिकेत असायच्या. त्यामुळे एकसारख्या भूमिका करण्यापेक्षा मला इंडस्ट्री सोडणे योग्य वाटले.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीbollywoodबॉलिवूड