पाटणा : बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी वाळू व्यावसायिकाकडून ३५ लाख रुपयांची लूट केल्याची घटना ताजी असतानाच बनावट पोलिसांनी चार घरांत लूट केल्याचे उघड झाले आहे. सारण जिल्ह्यात दारूची तपासणी करण्याच्या नावाखाली बनावट पोलीस घरात घुसले व लोकांकडील दागिने व रोख रक्कम लुटून नेली. एवढेच नव्हे तर दारासमोर बांधलेली शेळीही घेऊन गेले. चारचाकी वाहनातून आलेले बनावट पोलीस एकेक करून चार घरांत घुसले. लोकांना वाटले पोलीस आले आहेत. काही वेळाने लोकांनी विरोध केला असता पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्यांना गप्प बसवले. महिलांच्या नाक-कानातील दागिने ओरबाडून घेतले. या घटनेने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी लोकांनी केली आहे.
Crime News :बनावट पोलिसांनी केली ३५ लाख रुपयांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 06:01 IST