शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: डीएसपींना डंपरखाली चिरडणाऱ्या माफियांचा एन्काऊंटर, एकाला लागली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:02 IST

Crime News: सुरेंद्र बिश्नोई यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आले आहे. अटक करण्यापूर्वी आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यात एका आरोपीला गोळी लागली आहे.

चंडीगड - खाणमाफियांना रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपी सुरेंद्र बिश्नोई यांची  डंपरखाली चिरडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हरयाणातील नूंह इथे घडला होता. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, सुरेंद्र बिश्नोई यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आले आहे. अटक करण्यापूर्वी आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यात एका आरोपीला गोळी लागली आहे.

डीएसपी सुरेंद्र बिश्नोई हे नूंह जिल्ह्यात अवैध खाणकाम रोखण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान, त्यांना डंपरखाली चिरडून मारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सीआयए इंचार्ज सुरेंद्र सिद्धू यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि आरोपींमध्ये चकमक झाली. आरोपींना पकडण्यासाठी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक झाली.

डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना गावाशेजारील अरवली टेकडीवर बेकायदेशीर खाण सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ते मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या टीमसह पोहोचले.  पोलीस पथकाला पाहताच डंबर चालक व खाणकामातील इतर लोक डंपर घेऊन पळू लागले. डीएसपी गाडी थांबवण्यासाठी पुढे आले असता डंपर चालकाने त्यांच्यांवर डंपर चढवला. भरलेल्या डंबरच्या टायरखाली आल्याने डीएसपींचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर खाण माफिया घटनास्थळावरुन पळून गेले होते. घटनेची माहिती मिळताच एसपी नूह, एसडीएम आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून गाव आणि अरवली डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी आरोपींचा ठावठिकाणा समजताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता चकमक उडाली. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaryanaहरयाणा