शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनर किलिंग! जेवणासाठी बोलावलं अन् विष दिलं; प्रेमप्रकरण तरुणाच्या जीवावर बेतलं, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 10:07 IST

Crime News : तरुणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून तरुणाला विष भरवल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - झारखंडच्या दुमकामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरण एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून तरुणाला विष भरवल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनर किलिंगचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. या भागात मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विवेक कुमार साह याचं एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. शेजारच्या गावात राहणाऱ्या या मुलीचंही विवेकवर प्रेम होतं आणि दोघांनी लग्न करण्याची तयारी केली होती. 

प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना माहीत होती, मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला कडाडून विरोध होता. मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांच्याही घरच्यांना बोलावून घेत तरुणाला समज दिली होती. त्याच्याकडून सहीदेखील करून घेण्यात आली होती. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेच्या दिवशी तरुणाला तरुणीच्या फोनवरून एक फोन आला. त्याला घरी बोलावण्यात आलं. घरी पोहोचल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

जेवणातून तरुणाला जबरदस्तीने देण्यात आलं विष

जेवणातून तरुणाला जबरदस्तीने विष देण्यात आलं. या अवस्थेत तरुण कसाबसा घरी पोहोचला आणि त्याने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. विवेकची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आता कुटुंबीयांनी केला आहे. मुलाला वेळेवर उपचार मिळाले असते, तर तो वाचू शकला असता, असा दावा विवेकच्या वडिलांनी केला आहे.

पोलीस कारवाईत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप

विवेकने मृत्यूआधी दिलेल्या माहितीत तरुणीच्या कुटुंबीयांचं नाव घेतलं असलं तरी पोलीस सध्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतर कुटुंबीयांना अटक करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पोलीस कारवाई करण्याबाबत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. विवेकच्या नातेवाईकांनी तरुणीचं कुटुंब, पोलीस आणि रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस