शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट, पतीसह कुटुंब मृत्यूच्या दारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 09:52 IST

Crime News : लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरीने सासरच्यांना विष दिलं. त्यानंतर ती घरातील सोन्याचे दागिने आणि काही पैसे घेऊन पसार झाली आहे. नववधू भयंकर कट रचून पतीसह त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं आहे. सध्या या कुटुंबीयांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपूतली येथे ही भयावह घटना घ़डलीआहे. येथील कृष्णा टॉकीज परिसरातील पटवा गल्लीत राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचं 22 फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. कोटपूतली येथील लक्ष्मी नारायण मंदिरात हे लग्न पार पडलं होतं. लग्न झाल्यानंतर नववधू पूजा आनंदानं पतीसोबत नांदायला गेली होती. पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पूजाने सर्वांसाठी जेवण बनवलं. घरातील सर्वांना हे जेवण खाऊ घातलं. पण तिने स्वतः अन्नाचा एक कणही खाल्ला नाही. रात्री जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं. 

घरातील सर्व दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन काढला पळ

नवरीने हिच संधी साधून घरातील सर्व दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळ काढला आहे. घरातील कोणताच सदस्य घराबाहेर दिसला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, पोलीसही हादरून गेले. यानंतर पोलिसांनी तातडीने कुटुंबातील सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवरीचं नाव आणि घराचा पत्ता चुकीचा असण्याची शक्यता

नवरदेवाचे वडील नंदू पटवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न एका मध्यस्थाच्या माध्यमातून झालं होतं. त्याबदल्यात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला दीड लाख रुपये देण्यात आले होते. या प्रकरणी कोटपूतली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी नवरी पूजाची माहिती काढली जात आहे. तिचं नाव आणि घराचा पत्ता देखील चुकीचा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. पोलीस सध्या लग्नात मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या इतर लोकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न