शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची आग! 4 मुलांना सोडून पत्नी पळून गेली, 10 वर्षांनी परत आली; पतीने असा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:58 IST

Crime News : 4 मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेली होती आणि आता 10 वर्षांनी परत आली. यानंतर पतीने तिचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये डबर मर्डरची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेली होती आणि आता 10 वर्षांनी परत आली. यानंतर पतीने तिचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलांच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

हत्येनंतर सर्व आरोपी फरार असल्याची माहिती मिळत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जलालाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील डहर गावात ही भयंकर घटना घडली आहे. येथील निवासी असलेल्या ओम पालची पत्नी ममता हिचं गावातील रमनपाल सिंहसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. पती आणि चार मुलांना सोडून ती दहा वर्षांपूर्वी रमनपाल सिंहसोबत पळून गेली होती. तिचा खूप शोध घेण्यात आला. पण ती दोघंही कुठेच सापडली नाहीत. 

काही वर्षांनंतर ममता आपल्या प्रियकरासह हरियाणाच्या पानीपतमध्ये नोकरी करत असल्याची माहिती मिळाली. पण लॉकडाऊननंतर ममता आणि तिचा प्रियकर हे पुन्हा गावात परतले आणि गावातच राहू लागले. संध्याकाळी रमनपाल सिंह आपल्या शेतात जात होता. तेव्हा ओम पालने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला घेरलं आणि त्याची हत्या केली. यानंतर ममताची देखील हत्या केली. 

गावात झालेल्या या डबल मर्डरमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. एसपी एस आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, डहर गावात राहणाऱ्या ओम पालची पत्नी ममता गावातील रमनपालसोबत पळून गेली होती. यानंतर महिलेचा पती आणि मुलांनी रागाच्या भरात या दोघांची निर्घृण हत्या केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी