शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: 'माझ्या गर्लंफ्रेंडशी बोलू नकोस', भावाने भावाला बजावले, तो ऐकला नाही तेव्हा चाकूने वार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:26 IST

Crime News : मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आपल्याच भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण आता रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आपल्याच भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण आता रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. मिळालेल्या माहिनुसार आतेभावावर मामेभावाने हा जीवघेणा हल्ला केला. यातील एक भाऊ हा त्याच्या दुसऱ्या भावाच्या गर्लफ्रेंडशी बोलत असे. मात्र त्याला तसे न करण्याचे बजावल्यानंतरही तो ऐकला नाही. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्याच भावावर हा जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. जखमी तरुण सध्या आयसीयूमध्ये आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, ही घटना मीना पॅलेस कॉलनीमधील आहे. जीवन चरपट परिसरामध्ये या प्रकरणातील आरोपी तरुणाने आतेच्या मुलावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यामध्ये तरुणाच्या गळ्याची नस कापली गेली आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या मते हा हल्ला प्रेमाच्या त्रिकोणातून झाला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. दोन्ही भावांची एकच गर्लफ्रेंड होती. दुसरा भाऊ तिच्यासोबत फोनवरून बोलत असे. मात्र तिचा प्रियकर असलेल्या भावाला त्यावर आक्षेप होता. त्याने आपल्या गर्लफ्रेंडशी बोलू नको, असे भावाला बजावले. मात्र तो ऐकला नाही. त्यावरून वाद झाला आणि भावाने आपल्याच भावावर हल्ला केला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी भाऊ फरार आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार