शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद; डोक्यात खलबत्ता घालून पोलीस हवालदाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:58 IST

पत्नी, मुलीला अटक : मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद. कोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुलगी सासरी नांदत नाही या कारणावरून झालेल्या वादात मुलगी आणि पत्नीकडून पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास पूर्वेकडील नाना पावशे चौक भागात घडली. प्रकाश राजाराम बोरसे असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. हत्येप्रकरणी त्यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 

बोरसे हे गुरुवारी कामावरून संध्याकाळी सात वाजता कोळसेवाडीतील नाना पावशे चौक परिसरातील घरी आले. त्यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्न  झाले असून तिचे सासरकडील आडनाव पवार असे आहे. परंतु, तिचे नवऱ्याबरोबर पटत नसल्याने ती आई-वडिलांकडेच राहत होती. मुलगी सासरी नांदत नाही यावरून घरात रात्री आठच्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात प्रकाश हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.  या हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. दोघींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

मृतदेहाशेजारी त्या चार तास बसून होत्याकोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. तो तोडून ते घरात शिरले. घरात प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर मृतदेहाशेजारी माय-लेकी बसून होत्या. हत्या करून चार तास त्या मृतदेहाशेजारी बसून होत्या. घटना रात्री आठच्या सुमारास घडली. परंतु ती चार तासांनी म्हणजे रात्री १२ वाजता उघडकीस आली.

टॅग्स :Policeपोलिस