शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'ती' इन्स्टा पोस्ट जीवावर बेतली; 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 12:44 IST

Crime News : काही गुंडांनी शौकतने इन्स्टा पोस्ट केल्यानंतर त्याचं अपहरण केलं आणि त्याला एका फ्लॅटमध्ये नेऊन त्याच्यावर चाकूने वार केले.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इन्स्टा पोस्टमुळे अल्पवयीन मुलाने जीव गमावला आहे. 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असून आरोपीने चाकूने वार केला आहे. दिल्लीतील उत्तम नगर भागात ही भयंकर घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही अल्पवयीन मुलांनी व परिसरातील लोकांनी मिळून एका व्यक्तीची चाकूने 10 वार करून हत्या केली. मृत मुलाने या हत्या प्रकरणातील आरोपीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यावर काही कमेंट्स लिहिल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शौकत असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. परिसरातील काही गुंडांनी शौकतने इन्स्टा पोस्ट केल्यानंतर त्याचं अपहरण केलं आणि त्याला एका फ्लॅटमध्ये नेऊन त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळून काढला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोहन लाल हा या भागातील सराईत गुन्हेगार सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. शौकतने सोहन लालचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावर कमेंट लिहिली, असं आरोपींचे म्हणणे आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर सर्व आरोपींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शौकतचे अपहरण केले. 

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे शौकतकडे स्वतःचा स्मार्टफोनही नव्हता. तो नेहमी भाऊ आणि मित्रांचे फोन घेऊन सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर रील काढत असे. 26-27 डिसेंबरच्या मध्यरात्री, पोलिसांना एक पीसीआर कॉल आला की एक व्यक्ती सुप्रीम मॉडेल स्कूल, उत्तम नगरजवळ बेशुद्ध पडली आहे. जेव्हा दिल्ली पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा शौकत तिथे पडला होता, त्याला महिंदरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला डीडीयू हॉस्पिटलमध्ये रेफर केले. मात्र जीडी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी शौकतचा मृत्यू झाला होता.

शौकतवर आईस्क्रीम तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीक्ष्ण चाकूने अनेक वार केल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याच्या शरीरावर 8 ते 10 जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. शौकतच्या कुटुंबीयांनी परिसरातील गुंड आणि गुन्हेगार सोहन लालवर आरोप केले होते. पोलिसांनी तपास सुरू केला असता हत्येतील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सोहनलाल अद्याप फरार आहे. सोहनलाल यांच्यावर आरोप आहे की तो अनेकदा परिसरात दादागिरी करत असे. तो लोकांसोबत मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायचा. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्राम