शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Jitu Chaudhary : धक्कादायक! भाजपा नेत्याची भररस्त्यात निर्घृण हत्या; झाडल्या 6 गोळ्या, घटनेने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:41 IST

BJP Jitu Chaudhary : जीतू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आहेत. चौधरी हे भाजपाचे मयूर विहार जिल्ह्याचे मंत्री होते.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा नेत्याची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात भाजपा नेते जीतू चौधरी (BJP Jitu Chaudhary) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जीतू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आहेत. चौधरी हे भाजपाचे मयूर विहार जिल्ह्याचे मंत्री होते.

40 वर्षीय जीतू चौधरी याचा बांधकाम व्यवसाय होता. त्यांचा एका ठेकेदारासोबत पैशांवरून वाद सुरू होता. हत्येमागे व्यवहाराचा वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौधरी यांच्यावर बुधवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने सर्वांनाचा धक्का बसला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास गाझीपूर पोलीस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगदरम्यान मयूर विहार परिसरात गर्दी दिसली. ज्यामध्ये जितेंद्र उर्फ ​​जीतू चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

जीतू चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जखमी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर लोकांनी त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात नेले. त्याचवेळी रुग्णालयात डॉक्टरांनी जीतू चौधरी यांना मृत घोषित केलं. घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी