शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 12:39 IST

Crime News : तरुण कोर्ट परिसरातील वकिलांच्या चेंबरमध्ये रात्री झोपायचा.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जिल्हा न्यायालयात वकिलाच्या चेंबरमध्ये एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. सकाळी वकिलाने चेंबर उघडले आणि तरुणाचा मृतदेह बघून कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या महितीनुसार, तरुण कोर्ट परिसरातील वकिलाच्या चेंबरमध्ये रात्री झोपायचा. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणाचा मृत्यू अंमली पदार्थ सेवन केल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येत आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या (Tis Hazari Court Delhi) परिसरात उपस्थित असलेल्या वकिलांनी चेंबर उघडल्यावर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पश्चिम विभागातील वकिलाच्या चेंबरमध्ये मृतदेह पडलेला होता. उत्तर दिल्ली जिल्हा डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, मनोज असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. तो 35 वर्षांचा होता. या घटनेची माहिती तीस हजारी बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना आणि मृतकाच्या ओळखीच्या लोकांना देण्यात आली आहे. मनोज मूळचा बिहारचा असल्याची माहिती मिळाली आहे.

पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात

घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मृताच्या शरीरावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. अंतर्गत दुखापत असेल तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळेल. त्यामुळे मृत्यूमागचं ठोस कारण सांगता येणार नाही. पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मनोज या तरुणाला दारू पिण्याचे व्यसन होते. तो क्षयरोगामूळे दीर्घकाळ आजारी होता. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली