शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! मंडपाच्या ऐवजी रुग्णालयात पोहोचली नववधू; लग्नात DJ वरून जोरदार राडा, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:02 IST

Crime News : नवादामध्ये लग्नात डीजे लावावा यासाठी नववधू आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. याच दरम्यान बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवादामध्ये लग्नात डीजे लावावा यासाठी नववधू आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. गावातील काही लोक लग्नात जबरदस्तीने डीजे लावण्याची मागणी करत होते. सिरदला पोलीस ठाण्याच्या परिसरातील बेलदरिया गावात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असताना, लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीसह तिच्या कुटुंबीयाना बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

बेदम मारहाणीत नवरी गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. काही लोकांनी डीजे लावावा या मागणीसाठी नववधूच्या घराची तोडफोड केली. तसेच नातेवाईकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सर्वांना मारहाण करण्यात आली. उपचारासाठी सर्व कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नववधूचे काका गणेश चौहान यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

"उमेश चौहान, रामबालक चौहान, कमलेश चौहान, कुलदीप चौहानसह काही लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी लग्नात डीजे वाजवणं महत्त्वाचं आहे असं म्हटलं. आम्ही जमीन विकून आमच्या मुलीचं लग्न करत आहोत. डीजेची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगून देखील डीजे ट्रॉली घेऊन ते आमच्या दारात आले आणि पैसे मागू लागले" अशी माहिती नववधूच्या काकांनी दिली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. रिपोर्टनुसार राधे चौहान यांची मुलगी संगीता कुमारीचं लग्न ठरलं होतं. मुलाकडची मंडळी वरात घेऊन गावात येत होती. पण रस्त्यात त्यांना मुलीच्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीची माहिती मिळताच ते घाबरून पळून गेले. या घटनेने नववधूच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी