शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! 7 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, Video पाहून केलं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:21 IST

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे या मुलांनी मोबाईलवर व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे एका 7 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलांनी मोबाईलवर व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी गेम खेळतानाच 7 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केला. ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मुलांना मोबाईल दिला होता. पण त्यांनी त्याचा भलताच वापर केल्याचं आता समोर आलं आहे. एकाच कुटुंबातील 7 ते 13 वर्षे वयोगटातील 6 मुले मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहून मागील दीड महिन्यांपासून पीडित मुलीचे लैगिक शोषण करीत होते. याचदरम्यान मुलीची प्रकृती खालावली आणि तिच्या पोटात दुखू लागले होते. या प्रकाराबाबत घरातील कोणालाच काही कल्पना नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीडित मुलीच्या मोठ्या भावाला सर्वात आधी या गैरकृत्याबाबत संशय आला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराला वाचा फुटली. मुलीच्या मोठ्या भावाने शेजारील मुले त्याच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित घटनेच्या संशयातून त्याने कुटुंबीयांना अलर्ट केले. कुटुंबीयांनी आरोपी मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी बलात्कार केल्याची बाब कबूल केली. त्यानंतर पीडित मुलीला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि ही घटना पोलिसांनाही कळवण्यात आली.

नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या मोबाईलमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न साइट्स पाहण्याच्या लिंक सापडल्या आहेत. किशोरवयीन मुलासोबतच इतर मुलेही या मोबाईलवरून व्हिडीओ पाहत असत. पोलिसांच्या चौकशीत, मुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी होऊन अभ्यास करण्यासाठी मोबाईल दिल्याचे समोर आले. मोबाईल दिल्यानंतर मुले काय वापरतात याकडे कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ आणि लिंक सापडल्या आहेत. या साइट्सवर मुले कशी प्रवेश करतात याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड