शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Crime news : आयकर विभागाची भीती घालून लुटलं; तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 06:16 IST

आयकर विभागाची भीती घालून लुटले, गुन्हे शाखेकडून तपास सुरू

मुंबई : पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्याच पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.             

अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहायक निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कदम आणि जमदाडेला अटक करण्यात आली असून, वंगाटेचा शोध सुरू आहे. गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी भुलेश्वर येथील अंगडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सावंत यांची भेट घेऊन त्रिकुटाकडून पैशासाठी सुरू असलेल्या त्रासाबाबत सांगितले होते.   

हे तिन्ही अधिकारी पोफळवाडी परिसरात ज्यांच्या हातात पैशांची बॅग असेल त्यांना मुंबादेवी पोलीस चौकीत नेऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असत. याबाबतची लेखी तक्रार मिळताच, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, दिलीप सावंत यांनी याच्या नेतृत्वात चौकशी सुरू केली. यात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही, तसेच तक्रारदार आणि आरोप असलेल्या पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यामध्ये या त्रिकुटाने २, ३,४ आणि ६ डिसेंबर रोजी पोफळवाडी परिसरात अंगडिया व्यापार करणाऱ्याना आयकर विभागाची भीती घालून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले. तसेच, पोलीस ठाण्याबाहेर जाताना नोंदवहीत नमूद करणे गरजेचे असताना, वरील चार तारखांना त्यांनी कुठलीही नोंद केली नव्हती. तसेच, ६ डिसेंबर रोजी तपासणी केलेल्या व्यक्तीची नावे फक्त दैनंदिनीमध्ये नोंद केली आहे. मुंबादेवी चौकीमधील घडामोडीबाबतही कोणत्याही नोंदी करण्यात नव्हत्या.     

वंगाटेने पोफळवाडी परिसरात अंगडियाना अडवून त्यांच्याकडे पैशांच्या बॅगा तपासल्या. मात्र, याबाबतच्या कुठल्याही पंचनाम्याची नोंद करण्यात आलेली नाही. तपासात तिघांनीही संशयितांवर कारवाई करण्याच्या नावाखाली वसुली केल्याचे स्पष्ट होताच, गुन्हा नोंदवत अधिक कारवाई सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

चुकीच्या नोंदी... ओम वंगाटे याने ठाण्यातील नोंदीमध्ये काही साक्षीदारांच्या चुकीच्या नोंदी केल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, संबंधित पुरावे सावंत यांनी वरिष्ठांना सादर केले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये भेटीगाठी कैद..सीसीटीव्हीमध्ये एल.टी. मार्ग ते मुंबादेवी चौकीपर्यंतच्या सीसीटीव्हीमध्ये अंगडिया यांना चौकीकडे घेऊन जाण्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. यामध्ये कदम, आणि जमदाडे यांनी वंगाटे वरिष्ठ असल्यामुळे त्याच्या आदेशाचे पालन केल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीIncome Taxइन्कम टॅक्स