शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नालासोपाऱ्यात गळा कापून एकाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:34 IST

श्रीराम नगर परिसरातील एका बंद घरात एकाचा धारदार हत्याराने गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- श्रीराम नगर परिसरातील एका बंद घरात एकाचा धारदार हत्याराने गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. पेल्हार पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या कोणी व का केली याचा शोध घेत तपास करत आहे.

श्रीराम नगरच्या घरत वाडी येथील जोगेंद्र यादव चाळीत प्रमोदकुमार उर्फ कतवारू बिंद (५१) हे दोन मुले व एका सुनेसह राहत होते. घरातील बाकीचे गावी गेले होते व प्रमोदकुमार हेच घरी एकटे होते. त्यांचा मोठा मुलगा प्रदीपकुमार याने शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास काकाचा मुलगा आशिष याला फोन केला. वडिलांचा फोन लागत नसून तो बंद असल्याने फोन का बंद आहे हे घरी जाऊन खात्री करून फोन करण्यास सांगितले.

काका दीपनारायण बिंद आणि त्यांचा मुलगा आशिष घरी गेल्यावर घराच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून बंद असल्याचे त्याला दिसले. दरवाज्याच्या बाजूला खिडकी उघडी असल्याने असल्याने आशिषने डोकावून पाहिल्यावर घरात रक्त दिसले. तसेच प्रमोदकुमार यांचे पाय जमिनीवर दिसले. त्यामुळे लहान भाऊ आणि त्याच्या मुलाने खात्री करण्यासाठी दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. प्रमोदकुमार हे उताण्या अवस्थेत व गळ्यावर धारदार हत्याराने वार करून रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांनी लगेच पेल्हार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पेल्हार पोलिसांनी कोणत्यातरी कारणावरून आरोपीने प्रमोदकुमार यांचा गळा चिरून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपाराPoliceपोलिस