शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! बहीण घराबाहेर पडत असल्याने संतप्त भावाने कात्रीने वार करून केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 19:34 IST

Crime News : संतप्त झालेल्या भावाने थेट बहिणीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे.

नवी दिल्ली - छत्तीसगडच्या कोरबामध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बहिणीने घराबाहेर पडण्यावरून झालेला वाद टोकाला गेला आहे. संतप्त झालेल्या भावाने थेट बहिणीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे. बहिणीने घराबाहेर पडणं मान्य नसलेल्या भावाने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये बहीण गंभीररित्या जखमी झाली आहे. मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, करतळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेहरचुंआ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील भावाबहिणीमध्ये सतत वाद होत होते. आपल्या बहिणीने सतत घराबाहेर पडणं भावाला मान्य नव्हतं. त्यावरून तो अनेकदा तिला जाब विचारत असे आणि तिच्या बाहेर पडण्यावर आक्षेप घेत असे. याच दरम्यान एकदा बहीण आपल्या घरामध्ये शिवणकाम करत असताना अचानक भाऊ तिथे आला आणि पुन्हा त्याच मुद्द्यावरून वाद घालू लागला. दोघांमधील वाद विकोपाला गेला. 

भावाने तिथली कात्री घेऊन बहिणीवर वार केले. तिच्या चेहऱ्यावर, कानावर आणि कंबरेवरही वार केले. यात बहीण गंभीर जखमी झाली. कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. बहिणीवर वार करणाऱ्या तरुणावर त्याच्याच वडिलांनी अखेर गुन्हा दाखल केला. आपला मुलगा मनोरुग्ण असल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलं. तरुणीवर सध्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ रेकॉर्ड करून दिली जीवे मारण्याची धमकी

मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने महिलेचे काही व्हिडीओ रेकॉर्ड करून जीवे मारण्याची धमकीही दिली. महिला क़ॉन्स्टेबलने पाच जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पीडित महिला कॉन्स्टेबल या नीमचच्या रहिवासी आहेत. सध्या त्या इंदूरमध्ये कार्यरत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी