शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: गर्लफ्रेंडच्या बाथरुममधून यायचा कुबट वास, शोध घेतल्यावर जे समोर आले ते पाहून बॉयफ्रेंडला बसला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:06 IST

Crime News: घर गर्लफ्रेंडने खरेदी केले होते. मात्र त्या घराची संपूर्ण देखभाल आणि सर्व काम बॉयफ्रेंडच करायचा. सुरुवातीला सारं काही आलबेल होतं. मात्र काही दिवसांनंतर बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या बाथरूमधून कुबट दुर्गंधी येऊ लागली.

वॉशिंग्टन - आजकाल लग्नापूर्वी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लग्नाआधीच लिव्ह इनमध्ये राहू लागले आहेत. करिअरच्या व्यस्ततेमधून वेळ मिळत नसल्याने अनेक जोडपी लिव्ह इनमध्ये राहतात. पेन्सिल्वेनियामध्ये राहणाऱ्या ट्रेसी दौड्सने आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी एक घर खरेदी केले होते. ती आणि तिचा प्रियकर त्या घरात राहत होते.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार घर गर्लफ्रेंडने खरेदी केले होते. मात्र त्या घराची संपूर्ण देखभाल आणि सर्व काम बॉयफ्रेंडच करायचा. सुरुवातीला सारं काही आलबेल होतं. मात्र काही दिवसांनंतर बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या बाथरूमधून कुबट दुर्गंधी येऊ लागली. ही दुर्गंधी बहुतांश रात्रीच यायची. त्यामुळे बॉयफ्रेंडला त्या घरात राहणे कठीण झाले. गर्लफ्रेंड रात्री असं काय करते, ज्यामुळे बाथरूममधून दुर्गंध येते, असा प्रश्न बॉयफ्रेंडला पडला.

त्यानंतर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसोबत मिळून बाथरूममध्ये शोध घेतला. बाथरुममध्ये एखादी मांजर मेली असावी, त्यामुळे कुबट वास येत असावा, असं बॉयफ्रेंडला वाटलं. अखेर नेमकी कोणती वस्तू आहे ज्यामुळे दुर्गंध येतेय हे शोधण्यासाठी बॉयफ्रेंडने प्लंबरला बोलावले. मात्र जेव्हा प्राण्याचा शोध सुरू झाला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. गर्लफ्रेंडच्या बाथरूममध्ये जे काही सापडले ते पाहून बॉयफ्रेंडला धक्काच बसला.

बॉयफ्रेंडने जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडच्या बाथरूममध्ये थोडं खोदकाम केलं तेव्हा बाथरूमच्या फरशीखाली एक सांगाडा सापडला. ते पाहून गर्लफ्रेंडलाही क्षणभर विश्वास बसला नाही. त्यांनी घर घेण्यापूर्वी तिथे कुठल्यातरी व्यक्तीचा मृतदेह पुरण्यात आला होता. त्यामुळे तिथे दुर्गंधी पसरली होती. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तपास केला तेव्हा हा मृतदेह तिथे बऱ्याच दिवसांपासून लपवलेला होता असे समोर आले. दरम्यान, या घटनेनंतर सदर गर्लफ्रेंडला मोठा धक्का बसला आहे. एका सडत असलेल्या मृतदेहावर ती एवढे दिवस आंघोळ करत होती, यावर तिला विश्वास बसत नाही आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHomeसुंदर गृहनियोजनInternationalआंतरराष्ट्रीय