शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गटारात आढळले मृतदेहाचे तुकडे; शिर, धड शोधण्यासाठी पोलिसांची पथके, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 20:28 IST

Crime News : परिसरात दिवसा मोठी वर्दळ असते त्यामुळे रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई - एपीएमसीमधील दाणाबंदर आवारातील गटारात प्लास्टिकच्या पिशवीत अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. त्यात केवळ हात व पायाचा समावेश असल्याने उर्वरित धड व शिर कुठे टाकले असावेत याचा पोलीस तपास करत आहेत. सदर परिसरात दिवसा मोठी वर्दळ असते त्यामुळे रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एपीएमसीमधील दाना बंदर ते माथाडी भवन दरम्यानच्या मार्गालगत असलेल्या गटारात हे मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. त्याठिकाणी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली असता एका गरामध्ये प्लास्टिकची पिशवी आढळून आली. ही पिशवी पोलिसांनी उघडली असता त्यामध्ये अज्ञात व्यक्तीचे हात व पाय आढळून आले. यावरून सदर व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ट करून ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे त्याठिकाणी टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हाती लागलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांवरून मृत व्यक्तीचे वय सुमारे ३० ते ४० वर्षे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात काळा धागा बांधलेला आहे. मात्र अवघ्या हात व पायाच्या तुकड्यावरून त्याची ओळख पटवण्याची आव्हान पोलिसांपुढे आहे. तर मृतदेहाचे उर्वरित तुकडे कुठे टाकले असावेत याच्या शोधासाठी एपीएमसी पोलीसांनी परिसर पिंजून काढला. यानंतरही काहीच काही लागले नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान तयार झाले आहे. 

पिशवीतून आणलेले मृतदेहाचे तुकडे रात्रीच्या सुमारास त्याठिकाणी टाकले असावेत अशी शक्यता आहे. त्यानुसार सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मार्गाने प्रवास केलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. त्याशिवाय शहरातून एखादी व्यक्ती बेपत्ता आहे का याचाही तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकासह श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेच्या अनुशंगाने एपीएमसी पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. 

परिसरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीमुळे पाहणी दरम्यान गटारात प्लॅस्टिकची पिशवी आढळून आली. त्यामध्ये अज्ञात पुरुषाचे हात व पाय तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मृतदेहाच्या उर्वरित तुकड्यांचा शोध सुरू असून गुन्हेगारांचा देखील शोध सुरू आहे. 

विकास रामुगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक- एपीएमसी पोलीस ठाणे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई