शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

हत्या की आत्महत्या? बाप-लेकीचा लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; खोलीत झोपलेली पत्नी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:30 IST

Crime News : वडील आणि एक वर्षाच्या मुलीचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा पत्नी देखील घरामध्ये उपस्थित होती.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वडील आणि एक वर्षाच्या मुलीचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा पत्नी देखील घरामध्ये उपस्थित होती. ती दुसऱ्या खोलीत झोपली असल्याचं म्हटलं जात आहे. पतीने कधी हे टोकाचं पाऊल उचललं हे समजलंच नाही असं देखील पत्नीने म्हटलं आहे. पतीचा मृतदेह हा बेडवर बसून गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हापुड येथे राहणाऱ्या 25 वर्षीय अमित गाझियाबादच्या बहरामपूर गावामध्ये पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. सेल्समनची नोकरी करत होता. गुरुवारी रात्री अमित आणि त्यांची पत्नी घरामध्ये वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. त्यानंतर सकाळी पत्नीला त्यांचा मृतदेह दिसला. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना आपल्या घरी बोलावलं. यानंतर पोलिसांना देखील घटनेची माहिती देण्यात आली. अमितच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजता पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर ते दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये निघून गेले. 

कौटुंबिक भांडणातूनच अमितने एक वर्षाच्या मुलीची गळ्या दाबून हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केली अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. य़ा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पत्नीने हे कधी झालं याबाबत मला काहीच माहीत नसल्याचं म्हटलं आहे. तर शेजारी राहणाऱ्या रवि जाटव याने तरुणाची हत्या करून मृतदेह लटकवल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पोस्टमार्टम रिपोर्टमधून नेमकं कारण समोर येईल असं म्हणत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश