शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ऐन दिवाळीत कारमध्ये सापडले पती-पत्नीचे मृतदेह, नंतर समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 09:41 IST

Crime News: ऐन दिवाळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारमध्ये दाम्पत्याचा मृतदेह मिळाला. यामधील पत्नीचा गळा चाकूने कापण्यात आला होता. तर ड्रायव्हिंग सिटवर पतीचा मृतदेह पडला होता.

देवास (मध्य प्रदेश) - ऐन दिवाळीमध्ये देवास शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारमध्ये दाम्पत्याचा मृतदेह मिळाला. यामधील पत्नीचा गळा चाकूने कापण्यात आला होता. तर ड्रायव्हिंग सिटवर पतीचा मृतदेह पडला होता. मृत व्यक्ती सरकारी शाळेमध्ये शिक्षक होती. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे प्रकरण हत्येनंतर आत्महत्येचे असल्याचे दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे कारमध्ये विषाचे दोन पाऊच मिळाले आहेत.

देवास बायपासजवळ विजयागंज मंडी सर्व्हिस रोडवर एक रिकामी कार उभी होती. त्यामध्ये ड्रायव्हिंग सिटवर पती आणि बाजूच्या सिटवर पत्नीचा मृतदेह पडलेला होता. पत्नीचा मृतदेह चाकूने गळा कापलेल्या अवस्थेत होता. मृतांची ओळख चंद्रकांत मंडलोई आणि त्यांची पत्नी अलका अशी झाली आहे. दोघांचेही वय ३८ आणि ३५ वर्षे होते. मृत दाम्पत्याला १४ वर्षांचा एक मुलगा आहे.

मंडलोई दाम्पत्य चिडावडमधील त्यांच्या घरातून दिवाळीच्या संध्याकाळी खरेदी करण्यासाठी देवासकडे निघाले होते. मात्र दोघेही त्यांच्या कारमध्ये देवास बायपासजवळील विजयागंज मंडी सर्व्हिस रोडवर मृतावस्थेत सापडले होते. प्राथमिक अंदाजानुसार पती चंद्रशेखर यांनी हत्येनंतर आत्महत्या केली आहे. पत्नीचा गळा चाकूने कापल्यानंतर पतीने विषप्राशन केले असावे, अशी शक्यता आहे. मृत चंद्रशेखर मंडलोई रणायर येथील सरकारी शाळेत शिक्षक होते. दोन महिन्यांआधी ते मक्सी येथून कुटुंबासह चिदावड येथे भाड्याच्या घरात राहण्यासाठी आले होते.

देवासचे एसपी डॉ. शिवदयाल सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण आत्महत्येचे दिसत आहे. आधी महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरुषाने विषारी पदार्थ खाल्ला. त्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांना कारमधून सल्फासचे दोन पाऊच आणि एक चाकू सापडला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश