नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान बिहारमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. पुलावरून कालव्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतास जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांना जेव्हा या भयंकर घटनेची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी कालव्यामध्ये मृतदेह शोधण्यास सुरुवात केली.
तब्बल 12 तासांनंतर अनेक समस्यांचा सामना केल्यावर सोमवारी सकाळी डलमियानगर परिसराजवळीन कालव्यामध्ये मृतदेह सापडला. तरुणाच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गोविंदा असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव होतं. गेल्या वर्षीच त्याचं लग्न झालं होतं. मात्र बेरोजगार असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. खुप दिवसाँपासून तो काम शोधत होता. पण त्याला कामच मिळत नव्हतं.
बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे प्रमाण आता वाढत आहे. हातात काम नसल्याने अनेक तरूण आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बिहारच्या छपरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या गळ्यावर, पोटावर, चेहऱ्यावर तब्बल 15 हून अधिक वेळा चाकूने हल्ला केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आले आहेत. यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
क्रूरतेचा कळस! बलात्कारानंतर महिलेची निर्घृण हत्या; तब्बल 15 वेळा चाकूने केले वार नंतर फोडले डोळे
छपरा जिल्ह्यातील बनियापूर पोलीस ठाण्याच्या भागात ही भयंकर घटना आहे. एक 32 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत याच गावात राहते. नेहमीप्रमाणे ती महिला बकऱ्यांसाठी चारा आणावा म्हणून जंगलात गेली होती. मात्र रात्र झाली तरी महिला घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. खूप वेळ शोध घेतल्यानंतर गावाच्या बाहेर असलेल्या झुडपात महिलेचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेहाची स्थिती पाहून त्यांना देखील मोठा धक्काच बसला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.